सोलापूर पालिकेच्या तिजोरीत 1.25 कोटी जमा, महापौरांनी भरली सव्वा लाखाची थकबाकी

सोलापूर पालिकेच्या तिजोरीत 1.25 कोटी जमा, महापौरांनी भरली सव्वा लाखाची थकबाकी

  • Share this:

solapur_342311 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटांना पालिकांमध्ये कर भरण्यासाठी मुभा दिल्यामुळे लोकांनी पालिकांमध्ये गर्दी केलीये. सोलापूरमध्येही रात्रीपासून आज दुपारी बारावाजेपर्यंत 1 कोटी 25 लाखांहून अधिक थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला अच्छे दिन आले आहे.

सोलापूरच्या महापौर सुशीला अबुटे यांनी काल महापालिकेची सव्वा लाखाची थकबाकी भरली. एक हजार आणि पाचशेच्या नोटा भरुन त्यांनी या योजनेची सुरुवात केली. त्यानंतर आज तब्बल सव्वा कोटीहून अधिक थकबाकीची रक्कम एलबीटी, पाणीपट्टी, घरपट्टीच्या रुपात महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याचं पाहायला मिळालय. काही व्यापा-यांनी तब्बल दहा लाखाची थकबाकी देखील भरलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 11, 2016, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading