...आणि पैशांला पाय फुटले, महापालिकांमध्ये पैशांचा ढीग !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2016 05:54 PM IST

...आणि पैशांला पाय फुटले, महापालिकांमध्ये पैशांचा ढीग !

palika311 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यामुळे पैसे साठवून ठेवणाऱ्या आणि काळ्या पैसेवाल्यांना धडकी भरली. आता मिळेल तिथे लोक आता जुन्या नोटा खपवताना दिसत आहेत. हीच संधी साधलीय. याचा सर्वात मोठा फायदा झालाय. राज्यातल्या महापालिका आणि नगरपालिकांनी... कारण पालिकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा स्विकारायला सुरूवात केली. आणि अपेक्षितपणे पालिकांमध्ये पैशांचा ढीग साचलाय.

अमृत योजना लागू असलेल्या महापालिकांमध्ये तब्बल 15 कोटी 50 लाखांचा भरणा करण्यात आला. तर नगरपालिकांमध्ये जवळपास 40 कोटी रुपयांच्या करभरणा करण्यात आलाय. मुंबई महापालिकेन तर आज रात्री 12 वाजेपर्यंत करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर करभरणा होणार हे निश्चित. पालिकांच्या जुन्या नोटा घेण्याच्या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांची थकबाकी वसूल होतेय हेही नसे थोडके..

राज्यभरा़तील पालिकांमध्ये कालपासूनची किती कर वसुली ?

पुणे - 4.19 कोटी

कल्याण-डोंबिवली - 2.82 कोटी

Loading...

उल्हासनगर - 2.36 कोटी

नाशिक - 1.16 कोटी

गोंदिया - 1.15 कोटी

नागपूर - 1.10 कोटी

सांगली - 80 लाख

सोलापूर - 56 लाख

मीरा भाईंदर - 51 लाख

मालेगाव - 46 लाख

नवी मुंबई - 44 लाख

नांदेड - 24 लाख

जळगाव - 24 लाख

पिंपरी चिंचवड - 20 लाख

चंद्रपूर - 18 लाख

धुळे - 17 लाख

कोल्हापूर - 12 लाख

यवतमाळ - 8 लाख

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...