मुंबईतील पेट्रोलपंप शुक्रवारी मध्यरात्रीपासून पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहणार

मुंबईतील पेट्रोलपंप शुक्रवारी मध्यरात्रीपासून पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहणार

  • Share this:

mumbai petrol pump4310 नोव्हेंबर : मुंबईत शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत पेट्रोलपंप बंद राहणार आहेत. सुट्टे पैशांच्या वादावरुन कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनने हा खबरदारीचा निर्णय घेतलाय.

500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द झाल्यामुळे सर्वच ठिकाणी सुट्‌ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुट्टे पैसे घेण्यावरुन ग्राहक आणि पेट्रोलपंपावरील कर्मचा-यांमध्ये वाद होतायेत. या वादातून कर्मचा-यांवर आणि पेट्रोलपंपावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी 11 नोव्हेंबरला मध्यरात्री बारा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 10, 2016, 11:41 PM IST

ताज्या बातम्या