'पद्मावती'साठी नवे ड्रेस डिझायनर्स,राजेशाही पोशाखांबद्दल उत्सुकता

Samruddha Bhambure | Updated On: Nov 10, 2016 01:18 PM IST

'पद्मावती'साठी नवे ड्रेस डिझायनर्स,राजेशाही पोशाखांबद्दल उत्सुकता

10 नोव्हेंबर: संजय लीला भंसाळी लार्जर दॅन लाइफ सिनेमे बनवण्यात माहिर आहे. त्याच्या सिनेमातले पोशाखही श्रीमंती असतात. 'पद्मावती'मध्ये त्यानं कॉस्चुम डिझायनर म्हणून नेहमीची अंजू मोदी सोडून दिल्लीच्या रिंपल आणि हरप्रित नरुला यांना  जबाबदारी दिलीय.

अंजू मोदीनंच याआधी रामलीला आणि बाजीराव मस्तानी सिनेमांची कॉस्चुम्स डिझाइन केली होती.पण यावेळी भंसाळीनं नव्या कॉस्चुम डिझाइनरची निवड केलीय.

दीपिका पदुकोण,रणवीर सिंग, शाहीद कपूर यांच्या भूमिका असलेला 'पद्मावती' म्हणजे ऐतिहासिक गोष्ट आहे. सिनेमाच्या कथेसोबतच त्यातले पोशाख कसे असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

दीपिकाच्या लूकवर विशेष मेहनत घेतली जातेय. त्यासाठी श्रीलंकेहून एथनिक कॉस्चुम मागवले गेलेत. पद्मावती ही चितोडची राणी. त्यामुळे तिचे पोशाख तसेच असणार आहेत.

deepika-ram-leela-june20-750x500

शाहीद सिनेमात दीपिकाच्या नवऱ्याची भूमिका करतोय. 13व्या शतकातल्या राणा रावल रतनसिंगची भूमिका साकारतोय. तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजी उभा करतोय. रणवीरच्या व्यक्तिरेखेला तुर्कीची पार्श्वभूमी आहे.

सध्या रिंपल आणि हरप्रित ही मोठी संधी स्वीकारायला सज्ज झालेत. संशोधनासाठी ते राजस्थानच्या पुरातन वस्तू संग्रहालयाला भेटी देतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2016 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close