'खाकी'वरच जातिवादाचा आरोप

'खाकी'वरच जातिवादाचा आरोप

  • Share this:

 satish_mathur_vs_vithal_jadhav08 नोव्हेंबर : अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी थेट पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यावर मराठा असल्याने सातत्याने अपमान करत असल्याचा आरोप जाधव केलाय. त्यामुळे आत्महत्या करेन असे मेसेज सोशल मीडियावर जाहीरपणे व्हायरल केलेत. त्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये मराठा संघटनांना हे सगळं प्रकरण सांगू अशी धमकी ही दिल्याचं उघड झालंय. मात्र, अशा पद्धतीने थेट जातीचा आधार घेत पोलीस दलात राजकारण करण्याचा हा प्रकार पोलीस दलाची मोठी बदनामी करण्यास कारणीभूत झालाय.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस दलात भरती झालेले विठ्ठल जाधव हे पोलीस अधिकारी सध्या अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करताहेत. मात्र सुरुवातीपासून वादग्रस्त राहिलेल्या विठ्ठल जाधव यांनी आता थेट राज्याच्या पोलीस महासंचालकालाच जातीयवादाच्या भोव-यात आणलाय आणि मराठा असल्यामुळे पदोपदी महासंचालक सतीश माथूर हे आपला अपमान करत असल्याचं सांगून आता आपण आत्महत्या करणार आणि त्यापूर्वी हा मेसेज सगळ्या मराठा संघटना आणि आमदार खासदार याना पाठवणार आणि आत्महत्या करणार अशी धमकी मेसेज वॉर व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जाहीररित्या दिलीये. हा सगळं प्रकार खळबळ माजवण्याचा केलाय का असा विठ्ठल जाधव यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय. राज्याच गृहखातंही या प्रकारामुळे हडबडून जाग झालंय. या सगळ्या प्रकरणाची गृहसचिवांनी चौकशी सुरू केलीये.

विठ्ठल जाधव हे मराठा क्रांती मोर्चाच्या तापलेल्या वातावरणांत जातीचा आधार घेऊन आपली खात्यांतर्गत वादाची पोळी भाजून घेत असल्याचं चित्र यातून स्पष्ट होतंय. या वादाला मोठी पार्श्वभूमी ही आहे. उमरखेडच्या दंगलीत पोलिसांवर झालेली दगडफेक ,पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने केलेली फायरिंग आणि दंगल योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल दोषी अधिका-यांवर पाठीशी घालण्याचा आरोप विठ्ठल जाधव यांच्यावर चौकशीत ठेवण्यात आला होता. तेव्हापासून सुरू झालेला हा वाद आता जातीय वळणावर आणून ठेवल्यामुळे विठ्ठल जाधव यांच्यावर जातीपातीविरहित काम करणार खात म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलाची बेअब्रू केल्याची चर्चा पोलीस दलात सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 8, 2016, 5:05 PM IST

ताज्या बातम्या