राम रहिम सिंग बनवतायत सर्जिकल स्ट्राइकवर सिनेमा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2016 03:24 PM IST

राम रहिम सिंग बनवतायत सर्जिकल स्ट्राइकवर सिनेमा

08 नोव्हेंबर: 'द मेसेंजर' सिनेमामुळे चर्चेत आलेले संत गुरुमीत राम रहिम सिंग आता सर्जिकल स्ट्राइकवर सिनेमा बनवतायत. या सिनेमाचं शूटिंगही सुरू झालंय.

सिनेमाचं नावही भलंमोठं आहे. नाव आहे 'हिंद का नापाक को जवाब एमएसजी लायनहार्ट 2'. राम रहिम म्हणतात की, सर्जिकल स्ट्राइक झालाच नाही,असं म्हणणाऱ्यांना हा सिनेमा म्हणजे एक उत्तर असेल.

या सिनेमाची कथा सर्जिकल स्ट्राइकवर आहे. त्यात  दहशतवाद्यांचा खातमा करणाऱ्या लष्कराचं शौर्य दाखवलंय. सिनेमात स्वत: बाबा राम रहिम सिंग गुप्तहेराची भूमिका करतायत. हा गुप्तहेर पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो.

सिनेमाचं शूटिंग राजस्थान, हिमाचल,सिक्किम होणारेय.

बाबा राम रहिम यांनी सर्जिकल स्ट्राइकवर शंका घेणाऱ्यांवर टीकेची झोड उडवलीय.ते म्हणतात, शंका घेणारे कितपत देशभक्त आहेत? लष्कराचे जवान सीमेवर आपल्या रक्षणासाठी जागे असतात. त्यांच्यावर शंका घेणं चुकीचं आहे.

सर्जिकल स्ट्राइकवरच्या या सिनेमाचं शूटिंग महिनाभरात पूर्ण होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close