07 नोव्हेंबर : नवरा बायकोची भांडणं जगजाहीर आहे. पण प्राण्यांमध्ये अशी भांडणं होतात याचं जिवंत उदाहरण नॅशनल जिओग्राफी चॅनलने कॅमे-यात कैद केलंय. आपली पत्नी परपुरुषासोबत दिसल्यामुळे पतीराज पेंग्विनने युद्ध पुकारले आणि दुस-या नर पेंग्विनला रक्तबंबाळ होईपर्यंत 'धुलाई' केली. पण, या लढाईत मादी पेंग्विनच्या निर्णयामुळे पतिराज पेंग्विनला हार मानावी लागली.
नुकताच नॅशनल जियोग्राफी चॅनलनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या व्हिडिओत पेंग्विनची द्वंद लढाई कॅमे-यात कैद केलीये. त्याच झालं असं की, आपल्या पत्नीला दुस-या पेंग्विनसोबत पाहिल्यामुळे पतिराज पेंग्विनाला भलताच राग आला. जेव्हा त्याची पत्नी 'बाॅयफ्रेंड' पेंग्विनसोबत परत आली तेव्हा पतिराज पेंग्विनने बायफ्रेंड पेंग्विनवर हल्ला चढवला. दोघांमध्ये मादी पेंग्विनसाठी जोरदार लढाई झाली. बरं हे भांडण एवढ्यावर थांबलं नाही. उलट या भांडणाला स्वयंवराचं स्वरुप आलं. दोन्ही नर पेंग्विनच्या भांडणात विजयी पेंग्विनसोबत राहण्याचा निर्णय मादी पेंग्विनने घेतला.पहिल्या 'फेरीत' दुस-या पेंग्विनने बाजी मारली. त्यामुळे मादी पेंग्विनने पतिराजासोबत 'काडीमोड' घेण्याचा निर्णय घेतला आणि 'बॉयफ्रेंड' पेंग्विनसोबत घरोबा करण्याचं ठरवलंय.
मग काय पतिराज पेंग्विनचा चांगलाच पार चढला. त्याने पुन्हा एकदा बाॅयफ्रेंड पेंग्विनवर हल्लाबोल केला. अक्षरश : पतिराज पेंग्विनने चोचीने दुस-या पेंग्विनला जखमी केलं. पण मादा पेंग्विन आपल्या निर्णयावर ठाम राहते त्यामुळे पतिराज पेंग्विनला काढता पाय घ्यावा लागला. आणि बाॅयफ्रेंड पेंग्विन जखमी होऊनही 'बाजीगर' ठरला.
A fight breaks out when a husband comes home and finds his wife with another penguin. pic.twitter.com/9ejYGcJ5TJ
— Nat Geo Channel (@NatGeoChannel) November 4, 2016
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv