Elec-widget

हॉलिवूडपेक्षा बॉलिवूडच बरं-नवाजुद्दीन सिद्दिकी

हॉलिवूडपेक्षा बॉलिवूडच बरं-नवाजुद्दीन सिद्दिकी

  • Share this:

nawazzuddin

07 नोव्हेंबर:सध्या बॉलिवूड कलाकार हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करतायत. इरफान खान,अनुपम खेर,प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण असे अनेक जण हॉलिवूडमध्ये लोकप्रिय होतायत. पण नवाजुद्दीन सिद्दिकीला हॉलिवूडचं अजिबात आकर्षण नाही.

नवाजुद्दीन म्हणतोय की, 'हॉलिवूडमध्ये आता बरीच गर्दी झालीय.आणि मला आश्चर्य याचं वाटतंय की बॉलिवूडमध्ये इतके सकस विषय आहेत, चांगलं काम आहे. मग देशाबाहेर जायची गरजच काय?'

'आपल्या इकडे अनुराग कश्यपसारखे दिग्दर्शक आहेत. ते रमन राघव 2.0 किंवा गँग्ज ऑफ वासेपूरसारखे सिनेमे बनवतायत. आपल्याकडे मिस लव्हली आणि लंचबॉक्ससारखे सिनेमे बनतात. त्यांचा परदेशातही गौरव होतो.' नवाजुद्दीन म्हणतो.

नवाजुद्दीनच्या भूमिकांचं कौतुक परदेशातही होतं. नवाज ऑस्ट्रेलियन अभिनेत्री निकोलसोबत एक प्रोजेक्ट करणार आहे. पण त्याचं अजून नक्की झालेलं नाही.

Loading...

नवाजला हॉलिवूडमध्ये काम करण्यात फारसा रस नाहीय. पण त्याला परदेशातून ऑफर्सही खूप आहेत. नवाज म्हणतो की, मी इथे इतका बिझी आहे की परदेशात जायला वेळच नाही.

नवाज शाहरूख खानच्या 'रईस'मध्ये भूमिका साकारतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2016 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...