बिहारमध्ये रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2016 12:31 PM IST

बिहारमध्ये रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू

chatpooja2131

07 नोव्हेंबर : बिहारमधील छठपूजेला अपघातांच्या घटनांनी गालबोट लागले आहे. दरभंगा इथून छठपूजेवरुन परत येत असताना 6 महिलांचा ट्रेनखाली सापडून मृत्यू झाला.

रभंगा जिल्ह्यातील रामभद्रपूर स्थानकाजवळ छठपूजेवरुन परतणा-या सहा महिलांचा ट्रेनखाली सापडून अंत झाला. या सर्व महिला सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करुन घरी परतत होत्या. रेल्वे रुळ ओलांडत असताना स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस या ट्रेनखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी खळबळ माजली. जवळच्याच गावातील मंडळींनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. मात्र यादरम्यान महिलांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर स्थानिकांमध्ये असंतोष खदखदत असून संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलनाचा प्रयत्नही केला. या अपघातासाठी रेल्वे जबाबदार असून रेल्वेने भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी आहे.

दरम्यान, देशभरात आज छठपूजेचा पर्व साजरा होत असून मुंबईतील चौपाट्यांवरही उत्साहात छठपूजेचा पर्व साजरा करण्यात आला.यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2016 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...