राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येची सुवर्ण कमाई

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येची सुवर्ण कमाई

  • Share this:

reshma04 नोव्हेंबर : राष्ट्रकुल देशांच्या कुस्ती स्पर्धेच्या पहिल्यात दिवशी भारताच्या दोन महिला कुस्तीपटूंनी पदकांची कमाई केली आहे. या दोन्ही कुस्तीपटू महाराष्ट्रातील आहे. रेश्मा माने आणि सोनाली तोडकर या महाराष्ट्राच्या लेकींनी सिंगापूरमधील राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावली आहे.

कोल्हापूरची पैलवान रेश्मा हीनं महिलांच्या 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक कमावलं आहे. रेश्मानं या स्पर्धेत सिंगापूरच्या हुगीटिव्हाना आणि भारताच्या गार्गी यादवला मात देत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय. तर दुसरीकडे बीडची सोनाली तोडकरनं 58 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सोनालीला भारताच्या मंजूकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे सोनालीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2016 10:27 AM IST

ताज्या बातम्या