मिशाला वाढवताना मला माझ्या वडिलांसारखं वागायचं नाहीय - शाहीद कपूर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2016 03:28 PM IST

मिशाला वाढवताना मला माझ्या वडिलांसारखं वागायचं नाहीय - शाहीद कपूर

shahidkapoor1

04 नोव्हेंबर: सिनेमाबरोबर शाहीद कपूर सध्या मिशाच्या संगोपनातही बिझी आहे. शाहीद म्हणतो,आपले वडील हायपर आणि अति काळजी कळणारे आहेत. मिशाला वाढवताना मला तसं व्हायचं नाहीय.

मीरा आणि शाहीदला ऑगस्टमध्ये मुलगी झाली ती मिशा. कलर्स इनफिनिटीवरच्या एका शोमध्ये बोलताना शाहीद पंकज कपूरबद्दलच्या आठवणी शेअर करत होता. 'माझे डॅड एक चांगला माणूस आहेत. इतकं चांगलं कुणी असू शकत नाही. त्यांच्याकडे बऱ्याच चकित करून टाकणाऱ्या गोष्टी आहेत.पण त्यांच्या स्वभावातला काही भाग मला माझ्या मुलीला वाढवताना स्वत:मध्ये आणायचा नाहीय,' शाहीद सांगतो.

'ते माझे मित्रच आहेत. पण ते हायपर आहेत. मुलांची अति काळजी करतात. मला तसं व्हायचं नाहीय.'शाहीद वडील बनणार हे कळल्यावरच पंकज कपूरनं त्याला सांगितलं, ' आता तुला मी ज्या तक्रारी करायचो त्या कळतील. त्या तू समजू शकशील'

शाहीद म्हणाला, ' डॅड नेहमी तक्रार करतात की मी फोन करत नाही. त्यांच्याशी कमी कनेक्ट राहतो. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. मी त्यांच्या सतत संपर्कात असतो.' मिशाचा जन्म झाल्यावर पंकज कपूरनं शाहीदला सुनावलेलं की आता तुला कळेल मूल आजूबाजूला नसलं तर किती चुकल्यासारखं वाटतं ते. शाहीद कपूरनं दिलखुलासपणे वडील-मुलाचं नातं सगळ्यांसमोर आणलं.शाहीद कपूर सध्या विशाल भारद्वाजचा 'रंगून' आणि संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावती' सिनेमांमध्ये बिझी आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...