दोन बड्या सिनेमांचं बॉक्स ऑफिसवर युद्ध

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2016 02:06 PM IST

दोन बड्या सिनेमांचं बॉक्स ऑफिसवर युद्ध

Shivaay-vs-ADHM

3 नोव्हेंबर: दिवाळीच्या मुहूर्तावर 'शिवाय' आणि 'ऐ दिल है मुश्किल' दोन सिनेमे रिलीज झाले.जेवढी हवा सिनेमांची होती तेवढी हवा बॉक्स ऑफिसवर चालते का याकडेच सगळ्यांचे डोळे लागले होते.पहिल्या दिवशी 'ऐ दिल है मुश्किल'ने 13 कोटींचा आकडा पार केला तर शिवायने देखील 10 कोटींची मजल मारली.

पण नंतर मात्र या दोन्ही सिनेमांच्या माऊथ पब्लिसिटीने बोंब केली. सिनेमाचं समीक्षण आणि प्रेक्षकांनी दिलेले दाखले फार बरे नव्हते आणि त्याचाच परिणाम सिनेमाच्या कलेक्शनवर होताना दिसला.

ऐश-रणबीरची केमिस्ट्री किंवा रणबीर-अनुष्काची धमाल असली तरी करण जोहरच्या विषयात काही नावीन्य नाही. पहिल्या विकेन्डच्या अखेरीस 'ऐ दिल है मुश्किल'ने जिथे 35 कोटी कमावले तिथे 'शिवाय'ला 28 कोटींवर समाधान मानावं लागतंय.गेल्या वर्षभराचं कलेक्शन बघता हा आकडा दिवाळी विकेन्डसाठी तसा फारच कमी आहे.

यामध्ये 'शिवाय' सिनेमाची गोची अधिक होण्याची शक्यता आहे कारण सिनेमाचं बजेटही 150 कोटींचं आहे तर 'ऐ दिल है मुश्किल' मात्र 70 कोटींमध्ये बनवण्यात आलाय.

Loading...

वीकेण्डनंतर दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर प्रगती करायला सुरुवात केलीय. पाच दिवसांचं 'ऐ दिल...'चं कलेक्शन झालंय 66.38कोटी रुपये, तर 'शिवाय' पोचलाय 57 कोटींपर्यंत.सध्या तरी बॉक्स ऑफिसवर रंजक युद्ध सुरू आहे. अजय देवगणचा ॲक्शन थ्रिलर बाजी मारतोय की करण जोहरचा रोमान्स,मैत्री, प्रेम..हे कळेलंच थोड्या दिवसात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...