रेल्वे स्टेशन्सबरोबरच आता धावत्या ट्रेन्समध्येही मोफत वायफाय!

रेल्वे स्टेशन्सबरोबरच आता धावत्या ट्रेन्समध्येही मोफत वायफाय!

  • Share this:

Wifi @station

03 नोव्हेंबर -  व्हॉट्सअॅप, व्हिडीओ, आवडती गाणी डाऊनलोड करण्यासाठी स्टेशन्सवरील मोफत वायफायसाठी आता थांबायला नको. येत्या वर्षभरातच प्रवाशांना लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफायची सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेलटेल कंपनीने पुढाकार घेतला आहे. येत्या दोन वर्षात ही सेवा सुरु केली जाईल असा अंदाज आहे.

मुंबईसह देशभरातील प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय पुरवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जात आहे. त्यापासून प्रेरणा घेत वर्षभरात मुंबईतील लाखो प्रवाशांप्रमाणेच देशभरातील 100 प्रमुख मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफायचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. पीपीपी (सार्वजनिक, खासगी सहभाग) तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यासाठी रेलटेल कंपनीने पुढाकार घेतला आहे.

रेल्वे मंत्रालयाचा भाग असणाऱ्या रेलटेल कंपनीने गुगल कंपनीच्या सहाय्याने देशभरातील 400 प्रमुख स्टेशन्सवर मोफत वायफाय पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने मुंबईतील लोकल, मेल, एक्स्प्रेस प्रवाशांनाही ही सुविधा देण्याची तयारी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात मोफत वायफाय देण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

मोफत इंटरनेट जोडणीचा हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात सर्व उपनगरीय लोकलमध्ये व किमान १०० मेल, एक्स्प्रेसमध्ये राबवला जाणार आहे. या ठिकाणी इंटरनेटचा वेग ४५ एमबीपीएसपेक्षा कमी नसेल, असे निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक लोकलमधील १ हजार, तर एक्स्प्रेसमधील 500 ते 600 प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या सेवेत व्हिडीओ, आयपीटीव्ही, ऑनलाइन गेम्स, ऑनलाइन म्युझिकचा वापर करणे सोपे ठरणार आहे. अर्ध्या तासासाठी ही सेवा मोफत असून त्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होतो..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 3, 2016, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading