02 नोव्हेंबर – भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी सामन्यांना 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. यासाठी टीम इंडियाची निवड झालीय. इशांत शर्माचं टीममध्ये कमबॅक झालंय.
इशांतला चिकुनगुनिया झाल्यामुळे तो न्यूझीलंड सीरिजसाठी बाहेर होता. हादिर्क पंड्याचाही टीममध्ये असेल. चेतेश्वर पुजारा तिसर्या नंबरवर खेळणार आहे.
इंग्लंडची टीम आज दुपारी मुंबईमध्ये आली. बुधवारी 9 नोव्हेंबरला राजकोटमध्ये पहिली कसोटी रंगणार आहे. राजकोटमधल्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये ही मॅच खेळली जाईल.
भारत x इंग्लंड कसोटी : मालिकेसाठी टीमची निवड
- विराट कोहली (कर्णधार)
- अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार)
- गौतम गंभीर
- चेतेश्वर पुजारा
- वृद्धीमान साहा
- हार्दिक पंड्या
- करुण नायर
- जयंत यादव
- इशांत शर्मा
- आर. अश्विन
- रवींद्र जाडेजा
- अमित मिश्रा
- मुरली विजय
- उमेश यादव
- मोहम्मद शामी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv