मुंबईत 6 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाची रंगीत तालीम

मुंबईत 6 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाची रंगीत तालीम

  • Share this:

Maratha kranti morcha

02 नोव्हेंबर - गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची येत्या रविवारी 6 नोव्हेंबरला मुंबईत रंगीत तालीम होणार आहे. मुंबईतल्या सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाइक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीने केली आहे. मधल्या काळात सरकारवर दबाव राहावा, म्हणून बाइक रॅली काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

कोपर्डीतील नराधमांना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले जाईल, असंही समितीनं सांगितलं.

सोमय्या मैदानावरुन सकाळी 9 वाजता निघणारी ही बाईक रॅली सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशनसमोर पोहोचेल. सीएसटीला छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिला जाईल. तसंच कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहून रॅलीची सांगता होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 2, 2016, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading