करण जोहरची लाज वाटते,शाहीद मोहम्मद रफींची सडकून टीका

करण जोहरची लाज वाटते,शाहीद मोहम्मद रफींची सडकून टीका

  • Share this:

shahid_Rafi_Youtube_021112016

2 नोव्हेंबर - 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात झालेल्या मोहम्मद रफींच्या अपमानाबद्दल त्यांचा मुलगा शाहीद रफी यांनी दिग्दर्शक करण जोहरवर सडकून टीका केलीय. सिनेमातला एक संवाद रफींचा अपमान करतो,असं शाहीद रफींचं म्हणणं आहे.

सिनेमात अनुष्का शर्माच्या तोंडी एक वाक्य आहे. ती म्हणते, 'रफी गायचे नाहीत,रडायचे.' शाहीद म्हणाले, 'हे खूप अपमानास्पद आहे. मला करण जोहरची लाज वाटते.मला करणकडून ही अपेक्षा नव्हती. माझ्या वडिलांनी करणच्या वडिलांच्या सिनेमासाठी गाणी गायलीयत आणि करणनंच त्यांचा अपमान करावा?'

शाहीद रफींनी अजून सिनेमा पाहिलेला नाही. ते म्हणतात, 'ज्याने कुणी हे संवाद सिहिलेत, तो मूर्ख आहे. त्याला ठाऊक नाही की रफीसाब कोण आहेत ते. ते प्रतिभावंत गायक होते. बहुआयामी होते. इतक्या मोठ्या गायकांबद्दल असं कसं लिहितात?'

करण जोहरनं याबद्दल माफी मागावी असं शाहीद यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात,' खूप लोकांनी सिनेमा पाहिलाय. आधीच नुकसान झालंय.आता एडिट होईल असं वाटत नाही. पण करणनं माफी मागावी.'

आपले वडील अजून लोकप्रिय असल्याचं शाहीद म्हणतात.36 वर्षांनीही त्यांची लोकप्रियता तशीच आहे.ते म्हणाले,'फेसबुक अकाऊंटवर त्यांच्या वडिलांसाठी नऊ हजार मेसेज आलेत.ते याचा निषेध करतायत.

मोहम्मद रफींनी करण जोहरच्या वडिलांसाठी यश जोहरसाठी 1980मध्ये 'दोस्ताना' सिनेमासाठी गाणं म्हटलं होतं.त्यातलं 'मेरे दोस्त किस्सा यह क्या हो गया' गाणं लोकप्रिय झालेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2016 01:07 PM IST

ताज्या बातम्या