मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग

मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग

29 एप्रिल महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषेसाठी मंत्रालयात स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.काल झालेल्या राज्य सरकारच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मराठीसाठी स्वतंत्र खाते सुरू झाल्यानंतर, भाषा संचालनालयही या खात्याच्या अखत्यारित येणार आहे. या खात्याचा कारभार खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे.गेट वे ऑफ इंडियावर पार पडलेल्या या सोहळ्यात सिनेसृष्टीत योगदान दिलेल्या अनेक कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आशा काळे यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, सचिन पिळगावकर यांना व्ही. शांताराम विशेष योगदान, आशुतोष गोवारीकरांना युवा राज कपूर पुरस्कार तर, मनोज कुमार यांना 'राज कपूर ज्येष्ठ प्रतिभा गौरव' पुरस्काराने गौरवण्यात आले. नटरंगमधील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनसाठी अजय-अतुल यांना अनिल अरुण पुरस्कार, बेस्ट कोरिओग्राफीसाठी फुलवा खामकर, तर बेला शेंडे हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. झिंक चिका झिंकसाठी भरत जाधव याला उत्कृष्ट अभिनेता, आणि मी शिवाजी राजे भोसले बोलतोयसाठी सुचित्रा बांदेकर हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर सर्वाेत्कृष्ट सिनेमा म्हणून मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमाला गौरवण्यात आले. यावेळी आपल्याला मिळालेला पुरस्कार संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अर्पण करत असल्याचे मनोजकुमार म्हणाले.

  • Share this:

29 एप्रिल

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषेसाठी मंत्रालयात स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

काल झालेल्या राज्य सरकारच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मराठीसाठी स्वतंत्र खाते सुरू झाल्यानंतर, भाषा संचालनालयही या खात्याच्या अखत्यारित येणार आहे. या खात्याचा कारभार खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे.

गेट वे ऑफ इंडियावर पार पडलेल्या या सोहळ्यात सिनेसृष्टीत योगदान दिलेल्या अनेक कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

आशा काळे यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, सचिन पिळगावकर यांना व्ही. शांताराम विशेष योगदान, आशुतोष गोवारीकरांना युवा राज कपूर पुरस्कार तर, मनोज कुमार यांना 'राज कपूर ज्येष्ठ प्रतिभा गौरव' पुरस्काराने गौरवण्यात आले.

नटरंगमधील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनसाठी अजय-अतुल यांना अनिल अरुण पुरस्कार, बेस्ट कोरिओग्राफीसाठी फुलवा खामकर, तर बेला शेंडे हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.

झिंक चिका झिंकसाठी भरत जाधव याला उत्कृष्ट अभिनेता, आणि मी शिवाजी राजे भोसले बोलतोयसाठी सुचित्रा बांदेकर हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर सर्वाेत्कृष्ट सिनेमा म्हणून मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमाला गौरवण्यात आले.

यावेळी आपल्याला मिळालेला पुरस्कार संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अर्पण करत असल्याचे मनोजकुमार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 10:40 AM IST

ताज्या बातम्या