शाहरूख-आलिया पितायत करणसोबत कॉफी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2016 02:21 PM IST

शाहरूख-आलिया पितायत करणसोबत कॉफी

Zindagi_281016 (1)

28 ऑक्टोबर: करण जोहरच्या कॉफी विथ करण या लोकप्रिय शोच्या पाचव्या सीझनमध्ये पहिले गेस्ट आहेत शाहरूख खान आणि आलिया भट्ट. दोघांचाही 'डिअर जिंदगी' नोव्हेंबरमध्ये रिलीज होतोय. त्याचं प्रमोशन करायला किंग खान आणि आलिया करणसोबत कॉफी प्यायला पोचले.

शाहरुख खाननं या शोच्या सेटचे फोटोज्  ट्विट केलेत. फोटोत किंग खान,आलिया आणि करण दिसतायत.शाहरूखनं शोला शुभेच्छा दिल्यात.

शाहरूख म्हणतो, 'काही दिवस आनंदाचे असतात. कॉफीच्या टीमनं दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. शो पुन्हा एकदा रॉकिंग ठरू दे.'

'डियर जिंदगी'चं दिग्दर्शन गौरी शिंदेचं आहे आणि निर्मिती धर्मा प्रॉडक्शनची. कॉफी विथ करणचा हा पाचवा सीझन. पहिले चार सीझनही खूप लोकप्रिय झालेले. अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये धमाल केलेली आहे. नवा सीझन येत्या 5 नोव्हेंबरपासून सुरू होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2016 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...