नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

  • Share this:

sonavane_Vs_mundhe

28 ऑक्टोबर : नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावर कायम ठेवलं आहे. त्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत. तुकाराम मुंडे यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. मुंडे प्रकरणात शिवसेना अडचणीत आल्याने शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.  या बैठकीला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, महापौर सुधीर सोनावणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. तर भाजपने तुकाराम मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं.  तर दुसरीकडे तुकाराम मुंढेंनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पण आयुक्त मुंढे हे लोकप्रतिनिधींशी योग्य पध्दतीने वागत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यांचा सन्मान ठेवण्याच्या सूचना फडणवीस यांनी मुंडे यांना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या मागण्या जर बेकायदेशीर असतील, तर त्या मान्य करण्याची गरज नाही. पण लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचा आदर राखला गेलाच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 28, 2016, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading