शीना बोरा हत्याप्रकरणात सीबीआय पथकाकडून राकेश मारियांची चौकशी

शीना बोरा हत्याप्रकरणात सीबीआय पथकाकडून राकेश मारियांची चौकशी

  • Share this:

rakesh maria_news

28 ऑक्टोबर:  शीना बोरा हत्याप्रकरणात दिल्लीच्या सीबीआय पथकाने नुकतीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह दोन आयपीएस अधिकार्‍यांची चौकशी करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणात मारिया यांनी अधिकच स्वारस्य दाखवल्याने त्यांची नेमकी भूमिका या चौकशीत जाणून घेण्यात आल्याचे समजते.

एप्रिल २०१२ मध्ये स्टार इंडियाचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जीची पत्नी आणि आयएनएक्स मीडियाची संस्थापक इंद्राणी मुखर्जी हिने आपला दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांच्या मदतीने शीनाची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी इंद्राणीसह तिघांना पोलिसांनी अटक केली. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया स्वतः लक्ष घालून तपास करत होते. त्यासाठी मारिया वेळोवेळी खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहात होते. हा तपास विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर या प्रकरणात विशेष रस घेतल्याचा ठपका ठेवत मारिया यांची पदोन्नती देऊन बदली करण्यात आली. त्यानंतर शीना हत्याकांडाचा तपास पुढे सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्‍यांची नावं पुढे आली. दरम्यान, याप्रकरणात कोणत्या अधिकार्‍यांनी चौकशी केली आणि त्यांचा या चौकशीतील सहभाग कसा, याविषयीची माहिती सीबीआयने मिळवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 28, 2016, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading