News18 Lokmat

बिग बजेट सिनेमांची बिग कमाई

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2016 05:36 PM IST

बिग बजेट सिनेमांची बिग कमाई

[wzslider]27 ऑक्टोबर: सिनेमांची बजेट्स दिवसेंदिवस वाढतच आहेत. जेवढा खर्च होतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कमाई होते. असे अनेक बिग बजेट सिनेमे आतापर्यंत येऊन गेलेत. टाकू या एक नजर

बाहुबली- या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर कमाई केली. पण हा सिनेमा बनवण्यासाठी खर्च आला 250 कोटी रुपये. सिनेमाची कमाई झाली 545 कोटी रुपये.

रोबोट- रजनीकांतचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही तरच नवल. सिनेमातली ऐश्वर्या-रजनीकांत जोडी प्रेक्षकांना आवडली होती. सिनेमा बनला होता 150 कोटींमध्ये. सिनेमानं कमाई केली 300 कोटी रुपये.

बँग बँग - या सिनेमाचं बजेट होतं 140 कोटी रुपये. सिनेमानं कमाई केली 340 कोटी रुपये. हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांची जोडी हिट ठरली होती.

रा वन -शाहरूख खान-कतरिनाच्या या सिनेमावर टीकाही बरीच झाली होती. सिनेमाचं बजेटही खूप होतं. 135 कोटी. पण सिनेमानं कमाई केली 160 कोटी रुपये.

Loading...

किक- सलमान खानच्या किकचं बजेट होतं 115 कोटी रुपये. सलमानचा कुठलाही सिनेमा सुपरडुपर हिट होतोच. या सिनेमानं कमावले 400 कोटी.

क्रिश 3 - हृतिक रोशन आणि कंगना राणावतचा क्रिश 3 सिनेमा बनला होता 115 कोटींना. आणि सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली 245 कोटी रुपये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2016 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...