बहुचर्चित स्पेनमधून आलेली टॅल्गो ट्रेन परतीच्या वाटेवर

बहुचर्चित स्पेनमधून आलेली टॅल्गो ट्रेन परतीच्या वाटेवर

  • Share this:

talgo3

26 ऑक्टोबर : मुंबई दिल्ली दरम्यान गाजावाजात ट्रायल रन घेतलेली टॅल्गो ट्रेन परतीच्या वाटेवर आहे. स्पेनमधून आणलेली या ट्रेनचं ट्रायल रन झालं खरं पण ती विकत घ्यायची की नाही  याचा विचारच अजून रेल्वे मंत्रालयानं केलेला नाहीय. त्यामुळे मालवाहू जाहाजातून तिला परत स्पेनला पाठवलं जाणार आहे.

दिल्लीहुन मुंबईला पहिल्यांदा टॅल्गो ट्रेन आली तेव्हा तिला पाहायला मुंबईकरांनी तोबा गर्दी केली. देशातली पहिली हायस्पीड ट्रेन अशी मोदी सरकारने टॅल्गोची जाहीरात केली होती. भारतीय रेल्वेगाड्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे ती प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरली. त्यानंतर टॅल्गोची दिल्ली ते मुंबई अशी चाचणीही घेण्यात आली. ही चाचणी टॅल्गोने राजधानीपेक्षा 4 तास आधी मुंबईत पोहचून उत्तीर्णही केली. मात्र केंद्र सरकारने ही गाडी घ्यायची की नाही याबद्दल अजुन काहीही विचार केलेला नाही. त्यामुळे टॅल्गो परतीच्या प्रवासासाठी मुंबईत दाखल झाली आहे. तिला 22 नोव्हेंबरला मुंबईतुन स्पेनला पाठवण्यात येणार आहे.

खरंतर ऑगस्ट महिन्यात दिल्ली ते मुंबई या साडेतेराशे किमीच्या अंतरावर चार वेळा ट्रायल घेऊन 150 किमी प्रति तास या वेगाने राजधानी पेक्षा 4 तास आधी टॅल्गो मुंबईत पोहोचली होती. भारतीय रेल्वेचे ट्रॅक आणि ओव्हर हेड वायर, सिग्नलिंग यंत्राणा इतकंच नाही तर भारतीय रेल्वेच्या इंजिनाला  हे डबे जोडून त्याची ट्रायलही घेण्यात आली. लोकप्रिय घोषणा करुन लोकांना आपल्याकडे ओढु पाहणारं केंद्र सरकार बाबींची अंमलबजावणी करण्यात अयश्स्वी ठरतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 27, 2016, 12:08 PM IST

ताज्या बातम्या