Elec-widget

दगडांच्या मागे कपडे बदलावे लागले-कंगना राणावत

दगडांच्या मागे कपडे बदलावे लागले-कंगना राणावत

  • Share this:

INDIA-ENTERTAINMENT-BOLLYWOOD

26 ऑक्टोबर: अभिनेत्री कंगना राणावत विशाल भारद्वाजच्या 'रंगून'मध्ये दिसणार आहे. शूटिंगच्या वेळी काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं याबद्दल कंगनानं सांगितलं. ती म्हणाली, शूटिंगच्या वेळी दगडांच्या मागे लपून कपडे बदलावे लागले.

नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमात कंगनानं आपले शूटिंगचे अनुभव शेअर केले. रंगूनचं शूटिंग अरुणाचलमध्ये होत असताना, कपडे बदलण्यासाठी तिला दगडांच्या मागेच जावं लागलं. यावेळी तिनं 'क्वीन'च्या शूटचाही अनुभव सांगितला. युरोपला शूटिंग सुरू होतं. दोन शॉट्सच्या मधे कपडे बदलण्यासाठी कंगनाला युरोपच्या कॅफेचा आसरा घ्यावा लागायचा.

शूटिंगच्या वेळी अनेकदा तुम्हाला तुमच्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडावं लागतं, असं कंगना म्हणाली. सुरुवातीला टेंशन येतं. तिथे तुम्ही स्टार आहात याचा काही फरक पडत नाही. कंगना म्हणाली, रंगूनचं शूटिंग अरुणाचलच्या अशा प्रदेशात झालं, जिथे काहीच नव्हतं. ना गाव, ना कुठलीच रेस्ट रूम. पण शूट करावं तर लागलं.

पुढे कंगना म्हणाली, शॉट्ससाठी कपडे बदलावे लागणार होते. मग आमच्याच युनिटमधल्या माणसांनी पडदा धरला आणि मला शूटिंगसाठी तयार व्हावं लागलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...