31 ऑक्टोबरपर्यंत सर्व खड्डे बुजवा, हायकोर्टाचे पालिकेला आदेश

31 ऑक्टोबरपर्यंत सर्व खड्डे बुजवा, हायकोर्टाचे पालिकेला आदेश

  • Share this:

mumbai_pothols425 ऑक्टोबर : मुंबई हायकोर्टाने आज खड्‌ड्यांच्या प्रश्नीवर मुंबई महापालिकेला चांगलंच फैलावर घेतलं. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व खड्डे बुजवा, असा आदेश कोर्टाने दिला. पुढच्या वेळी कंत्राटं देताना चांगल्या कंत्राटदारांनाच काम मिळेल, याची काळजी घ्या, असंही कोर्टानं पालिकेला बजावलंय.

मुंबई महापालिकेनं 254 रस्त्यांच्या कामाचा अहवाल कोर्टाला दिला. पुढील वर्षी मान्सून सुरु होण्याच्या 2-3 महिने आधी काम संपेल. फेब्रुवारीपर्यंत पुढच्या मान्सूनपूर्वीच काम होईल अशी ग्वाही पालिकेनं कोर्टात दिली. पालिकेच्या या कारभारावर कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढले. पुढील कंत्राटं देताना चांगलं काम करणा•या कंत्राटदारांना काम दिले जाईल अशी ग्वाही पालिकेनं यावेळी दिली.

तसंच ज्यांनी चुकीची कामं केली त्यांना आम्ही काळ्या यादीत टाकलं आहे अशी माहितीही पालिकेनं कोर्टात दिली. यावर हायकोर्टाने येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व खड्डे बुजवा असे आदेश दिले. तसंच कोर्टानं एक महत्त्वाचं निरीक्षणही नोदवलं. पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीए यांच्या वादात खड्डे बुजत नाहीत, असं कोर्टानं म्हटलं. सर्व यंत्रणांनी आपली भूमिका कोर्टासमोर स्पष्ट करावी, असा आदेशही कोर्टाने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 25, 2016, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading