राज्याच्या उपराजधानीत आज #एकमराठालाखमराठा

 राज्याच्या उपराजधानीत आज #एकमराठालाखमराठा

  • Share this:

Maratha Muk mOrcha

25 ऑक्टोबर : राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये आज मराठा मोर्चा धडकणार आहे.  रेशीमबाग ते कस्तुरचंद पार्क असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.

मात्र, आजच्या मोर्चाला सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरू होतो त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. जिथे संपतो त्या ठिकाणी विधानभवन असल्याने ड्रोनला परवानगी नाकारली आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या डेडलाईनच्या आधीचा हा शेवटचा मोर्चा आहे. मागण्या मान्य न केल्यास यानंतर थेट हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा आयोजकांनी दिला आहे.

दरम्यान, या मोर्चामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच सर्वसामान्य जनतेस धोका, गैरसोय होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी व वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता ३६ ठिकाणी वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळती करण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होणार्‍या लोकांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनतळावर 200 स्वयंसेवक राहणार आहेत. या मोर्चा निमित्ताने वाहतूक शाखेच्या वतीने 355 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 25, 2016, 11:49 AM IST

ताज्या बातम्या