मुढेंविरोधात पक्षांची मोर्चेबांधणी, फुट टाळण्यासाठी नगरसेवकांना व्हिप

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2016 01:15 PM IST

Tukaram-Mundhe

24 ऑक्टोबर :  नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मुंढेविरोधात मंगळवारी महापालिकेत अविश्वास ठराव मांडला जाणार असून यासाठी शिवसेनेने नगरसेवकांसाठी व्हिप बजावला आहे. शिवसेनेच्या एका गटाला आयुक्तांविरोधातील आविश्वास ठरावाला शिवसेनेने पाठिंबा देऊ नये यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर दुसरा गट मात्र तुकाराम मुंढेविरोधातील अविश्वास ठरावासाठी आग्रही आहे.

प्रामाणिक आणि धोरणात्मक निर्णय घेणारा अधिकारी असं तुकाराम मुंढेंचं नावं घेतलं जातं. मात्र, महापौर, नगरसेवकांचा अवमान करणं, परस्पर निर्णय घेणं असे आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत, त्यांच्याविरोधात महापालिकेत अविश्वास ठराव आणण्याची तयारी राजकीय पक्षांमधून सुरू होती. पण आता त्यामध्येच मतभेद सुरू झाले आहेत.

नवी मुंबई महापालिकेत 111 नगरसेवक आहेत. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 69 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ मतदान करणे गरजेचे आहे. त्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून 37 नगरसेवक आहेत. पण हा ठराव आणणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येच मुंढेंबाबत फूट पडली आहे.राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांना मुंढे हवेत, मात्र पक्षाचे बडे नेते गणेश नाईकांना मुंढे नकोयत. शिवसेनेच्या 38 पैकी 32 नगरसेवकांना मुंढे हवेत. पण या मुद्द्यावरून नगरसेवकांमध्ये फूट पडू नये म्हणून शिवसेनेवर व्हिप काढण्याची वेळ आलीये. तर भाजपचे सहा नगरसेवक या अविश्वास ठरावादरम्यान तटस्थ राहण्याची शक्यता आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे मुंढेंशी मतभेद आहे. पण मुख्यमंत्र्यांचा मुंढेंना पाठिंबा असल्याने भाजपने तटस्थ राहणेच पसंत केले आहे.

दुसरीकडे नवी मुंबईतील रहिवासी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. नवी मुंबईकरांनी ‘सेव्ह तुकाराम मुंढे' अशी मोहीम देखील सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गतच वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकर एकत्र येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. सोशल मिडीयावरही यासाठी मोहीम राबवली जात आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2016 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...