उत्तर कोकण, वर्ध्यातही मराठा मूक मोर्चा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2016 06:28 PM IST

293704-maratha-arakshan

23 ऑक्टोबर :  मराठा समाजाच्या वतीने आज माणगाव, सिंधुदुर्ग आणि पालघर जिह्यात तर विदर्भातील वर्ध्यात एकमराठालाखमराठाचा मूक मोर्चा निघाला. विशेष म्हणजे, या मोर्च्यात मराठा आरक्षणासाठीचा पहिला अहवाल तयार केलेल्या 'राणे समिती'चे अध्यक्ष नारायण राणे हेही सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र निलेश राणे आणि नीतेश राणे हेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते. तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हेदेखील या मूक मोर्चात सहभागी झाले.

मराठा समाजाचा या मूक मोर्चासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी जमली होती. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा  समाजाला आरक्षण द्यावे, एॅट्राॅसिटी कायदा रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी मराठा  समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चे शांततेत निघत असले तरी पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2016 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...