अक्षय कुमार घेऊन येतोय 'गोल्ड', 15 ऑगस्ट 2018ला रिलीज

अक्षय कुमार घेऊन येतोय 'गोल्ड', 15 ऑगस्ट 2018ला रिलीज

  • Share this:

akshay-759

23 ऑक्टोबर : एअरलिफ्ट, बेबी,रुस्तम यांसारखे सुपरहिट देशभक्तिपर सिनेमे दिल्यानंतर अक्षय कुमार अजून एक सिनेमा घेऊन येतोय. तो म्हणजे गोल्ड. अक्षय कुमारनं नुकतंच ट्विट करून या सिनेमाची एक झलक दाखवलीय.

भारतानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948ला लंडन ऑलिंपिकध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्यावरच हा 'गोल्ड' सिनेमा आहे. किशन लाल यांच्या नेतृत्वात हॉकी टीमनं लंडन ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. स्वतंत्र भारताचं हे पहिलं गोल्ड.  हा सिनेमा 15 ऑगस्ट 2018मध्ये रिलीज होईल. 'तलाश'ची दिग्दर्शिका रीमा कागतीच या सिनेमाचं दिग्दर्शन करतेय.

बॉलिवूडमध्ये खेळावरचे सिनेमे अनेकदा हिट झालेत. लगान, भाग मिल्खा भाग, एम.एस.धोनी अशा अनेक सिनेमांची उदाहरणं देता येतील. त्यामुळे 'गोल्ड'बद्दलही उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 23, 2016, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading