पाक कलाकारांना काम देणाऱ्यांना राज ठाकरेंचा 5 कोटींचा दंड

  • Share this:

raj_thackeryमुंबई, 22 ऑक्टोबर : 'ए दिल है मुश्किल' सिनेमा अखेर रिलीज होणार आहे. पण पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट साकारणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 कोटींचा दंड भरण्याची सुचना केलीये. या अटीवरच या सिनेमांचा मार्ग मोकळा झालाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ए दिल है मुश्किल चित्रपटाबद्दल आपली भूमिका मांडली. ज्यावेळी तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज कराला त्याच्या सुरुवातील उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. त्यानंतर यापुढे पाकिस्तानी कलावंत, कर्मचारी चित्रपटात घेणार नाही असं लेखी लिहून द्यावं अशी अट राज ठाकरेंनी घातली.

तसंच ज्या कुणी निर्मात्यांनी पाक कलाकारांनी चित्रपटात घेतलं त्यांनी प्रत्येकी 5 कोटी रुपये प्रायश्चित म्हणून द्यावे आणि हे पैसे आर्मी वेअर फेअर फंडला द्यावे असा सुचना राज ठाकरेंनी केली. ही अट करणने मान्य केली. त्यामुळे आता ए दिल है मुश्किल सिनेमा आपल्या ठरलेल्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे

बैठकीत काय ठरलं?

- 'ए दिल...' 28 ऑक्टोबरलाच रिलीज होणार

- चित्रपटाच्या सुरुवातीला उरीमधल्या शहिदांना आदरांजली

- करणसह अनेक निर्माते सैनिक निधीसाठी पैसे देणार

- यापुढे पाक कलाकारांना घेणार नाही

- पाक कलाकरांसोबत कामही करणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 22, 2016, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading