22 ऑक्टोबर : 'ए दिल है मुश्किल'च्या वादावर अखेर तोडगा निघालाय. त्यामुळे येत्या 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मनसेनं आपला विरोध मागे घेतला असून काही अटींवर रिलीजसाठी मार्ग मोकळा करून दिलाय.
पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे रिलीज होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका मनसेनं घेतल्यामुळे 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट रिलीज होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आज मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून बैठक घेतली. या बैठकीत 'ऐ दिल है मुश्किल'ची पहिल्या दिवसाची कमाई निर्मात्यांनी उरीतल्या शहीद कुटुंबियांना द्यावा अशा फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे ह्या बैठकीला निर्माता करण जोहरसह मुकेश भट, यूटीव्हीचे सिद्धार्थ रॉय कपूर हेही हजर होते. मनसेकडून राज ठाकरेंसह शालिनी ठाकरे, अमेय खोपकर हे उपस्थित आहेत.
बैठकीत काय ठरलं?
- 'ए दिल...' 28 ऑक्टोबरलाच रिलीज होणार
- चित्रपटाच्या सुरुवातीला उरीमधल्या शहिदांना आदरांजली
- करणसह अनेक निर्माते सैनिक निधीसाठी पैसे देणार
- यापुढे पाक कलाकारांना घेणार नाही
- पाक कलाकरांसोबत कामही करणार नाही
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा