स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युतीचा निर्णय जिल्हास्तरावर-मुनगंटीवार

  • Share this:

mungatiwar20 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपची गेल्या 25 वर्षांची युती आहे आणि या वर्षीही युती होण्याची भाजपची इच्छा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युतीचा निर्णय जिल्हास्तरावर होणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टीका करू नये त्यामुळे मतदारामध्ये संभ्रम निर्माण होतो असंही मुनगटीवार म्हणाले. शिवसेनेवर टीका करू नये यासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, अलीकडे भाजपमधून स्वबळाचा नारा दिला जातोय. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 20, 2016, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading