ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 ला मंजुरी

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 ला मंजुरी

  • Share this:

kalyan_metro_519 ऑक्टोबर : मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या भरारीनंतर आता मुंबई उपनगरांनाही कवेत घेतलं जाणार आहे. कल्याण ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 आणि स्वामी समर्थ-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो 6 या मार्गांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो 6 आणि मेट्रो 5 च्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. तसंच मुंबई मेट्रोच्या लोगोचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सर जे. जे. स्कूल ऑफऍप्लाइड आर्ट्सची विद्यार्थिनी जुईली माहीमकरन या लोगोचं डिझाईन तयार केलंय. मुंबईमध्ये पुढच्या 15 वर्षांत मेट्रो रेल्वेचं जाळं उभं राहणार आहे. 2021 पर्यंत मुंबई मेट्रोचा हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. 3 टप्प्यांचा हा मेट्रो प्रकल्प एकूण 63 किमीचा असेल.

ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रो

ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो 24 कि. मी. लांबीचा

- एकूण 17 स्थानके असणार असतील आणि या

-प्रकल्पाची किंमत 8416 कोटी

असा असेल मार्ग

 कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगांव, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळुकंभ नाका, कापुरबावडी

स्वामी समर्थनगर-विक्रोळी मेट्रो 6

- स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मार्गाची लांबी 14.5 कि.मी.

- मार्गावर 13 स्थानके

- प्रकल्पाची किंमत 6672 कोटी

असा असेल मार्ग

स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, शामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग

मेट्रोचा आढावा

वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर

बांद्रा - कुर्ला - मानखुर्द

कुलाबा - बांद्रा - सीप्झ

मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा

चारकोप - दहिसर

घाटकोपर - मुलुंड

 

मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स - एअरपोर्ट - कांजुरमार्ग

अंधेरी - दहिसर

हुतात्मा चौक, चर्चगेट - घाटकोपर

शिवडी - प्रभादेवी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 07:14 PM IST

ताज्या बातम्या