News18 Lokmat

युरोपच्या मंगळ स्वारीची खबर खोडदच्या GMRT मध्ये !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2016 04:32 PM IST

युरोपच्या मंगळ स्वारीची खबर खोडदच्या GMRT मध्ये !

junar_gmrt19 ऑक्टोबर : युरोपियन स्पेस एजन्सीसाठी आजचा दिवस मोठा आहे. कारण युरोपियन स्पेस एजन्सीचं 'स्कियापॅरेली' हे अवकाशयान आज मंगळावर पोहोचणार आहे आणि हे यान मंगळावर पोहोचल्याचा सिग्नल मिळणार आहे, जुन्नरच्या खोडदमधल्या अवकाश संशोधन केंद्रात. खोडदमधल्या GMRT या अवकाश संशोधन केंद्रात महाकाय दुर्बीण आहे. ही दुर्बीण अवकाशयान मंगळावर पोहोचल्याचा पहिला सिग्नल पकडेल. आज संध्याकाळी ही खुशखबर या केंद्रात येऊन पोहोचेल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

मंगळावर यान पाठवण्यामध्ये आतापर्यंत फक्त 'नासा'लाच यश आलंय. 'नासा'चं क्युरिऑसिटी रोव्हर यान 6 ऑगस्ट 2012 मध्ये मंगळावर लँड झालं. मंगळावरचं वातावरण आणि जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आलंय. त्यातच आता युरोपियन स्पेस एजन्सीची ही मोहीम यशस्वी झाली तर मंगळ ग्रहाबद्दलच्या संशोधनाला आणखी बळ मिळेल.

याआधी 2004 मध्ये युनायटेड किंगडमच्या नेतृत्वाखाली बीगल - 2 हे यान मंगळावर पाठवण्यात आलं होतं. पण दुदैर्वाने हे यान मंगळावरून कोणतीही माहिती पाठवू शकलं नाही. त्यामुळेच 'स्कियापॅरेली' यान पाठवण्याच्या मोहिमेबद्दल तांत्रिक खबरदारी घेण्यात येतेय. एका इटालियन अंतराळ संशोधकाच्या नावावरून या यानाला हे नाव देण्यात आलंय. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर 2020 मध्ये युरोपियन एजन्सी मंगळावर 'क्युरिऑसिटी रोव्हर'सारखं जास्त क्षमतेचं यान पाठवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...