S M L

अनुरागचा उन्मादपणा, महिला पत्रकाराचा नंबर केला जगजाहीर

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2016 04:16 PM IST

अनुरागचा उन्मादपणा, महिला पत्रकाराचा नंबर केला जगजाहीर

19 ऑक्टोबर : अनुराग कश्यप सारखा मोठा दिग्दर्शक किती बेजबाबदार असावा याचा प्रत्यय काल आला. एका महिला पत्रकाराने प्रतिक्रिया मागण्यासाठी व्हॉटस्‌ऍपवर विचारलं असता.अनुराग कश्यपने तिचा नंबर थेट फेसबुकवर पोस्ट केला आणि पत्रकार कसे बेजाबदार असल्याचा कांगावा केला. पण, त्याच्या अशा या बेजाबदार वागण्यामुळे महिला पत्रकाराला धमकीच्या फोनचा सामना करावा लागला.

घडलेली हकीकत अशी की, IBN7च्या पत्रकार शिवांगी ठाकूर यांनी अनुरागला व्हॉट्सऍप केलं की, तुम्ही पाकिस्तानी कलाकारांबद्दल ट्विट करत आहात, तर कॅमे•यावर प्रतिक्रिया द्या. पण अनुराग कश्यपला काय झाले कुणास ठाऊक ? त्याने व्हॉटस्‌ऍप चॅटचा स्क्रीनशॉट काढला आणि तो थेट फेसबुकवर टाकला. त्याला एवढंही कळलं नाही की, फोन नंबर तरी ब्लर करावा. काही वेळातच शिवांगींना धमकीचे फोन यायला लागले. बांग्लादेश, पाकिस्तानमधून शिवांगींना फोन आले. सुरुवातीला हे फोन का येत आहे हे शिवांगी यांना कळले नाही. पण, अनुरागने त्याच्या फेसबुकवर नंबर पोस्ट केल्यामुळे हे सगळं घडत आहे हे कळताच त्यांना धक्का बसला. अनुरागच्या बेशिस्तपणाची काही वेबसाईटस्‌ने याची बातमी केल्यावर अनुरागनं ही पोस्ट डिलीट केली.

'ए दिल है मुश्किल'ची आणि पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण करताना अनुरागनं पंतप्रधानांना पाकिस्तानात गेल्याबद्दल माफी मागायला सांगितली आणि मग ट्विटर युद्ध सुरू झालं. सध्या उरी हल्ला, पाकिस्तानी कलाकार यावर मतप्रदर्शन करण्यात बॉलिवूडचे कलाकार एकदम सक्रिय झालेत. त्याचा फटका अनेकदा अशा प्रकारे पत्रकारांनाही बसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 04:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close