दीपिकाच्या 'XXX-द रिटर्न...'चं ट्रेलर 3 भारतीय भाषेत लाँच

  • Share this:

xxx-story-fb_647_071816011115

19 ऑक्टोबर : बिग बॉसच्या दहाव्या पर्वाच्या शुभारंभाला दीपिकाच्या चाहत्यांना खास सरप्राईझ मिळालं. तिच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं 'XXX-द रिटर्न ऑफ झेंडर केज' ट्रेलर लाँच दिमाखात झालं. पण महत्त्वाचं म्हणजे हे ट्रेलर भारतीय प्रेक्षकांसाठी चार भाषांमध्ये लाँच केलं गेलंय. इंग्रजी,हिंदी,तामिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये हे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. भारतीय प्रेक्षकांमध्ये हॉलिवूड सिनेमाची उत्सुकता वाढावी म्हणून निर्मात्यांनी ही खटाटोप केलीय.

विन डिझलच्या 'फास्ट अँड फ्युरियस'च्या सिरीजला भारतात मोठा प्रेक्षकवर्ग लाभला होता, त्यानंतर विन आणि दीपिका एकत्र असणार्‍या ट्रिपल एक्स सिरीजलाही भारतीय प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येनं यावा यासाठी हा फॉर्म्युला निर्मात्यांनी वापरला.यामुळे बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा भारतातही कोट्यवधी रुपये कमवेल अशी आशा वाटतेय.

दीपिका या सिनेमात ऍक्शन करतेय. दीपिका या सिनेमात शिकार्‍याच्या भूमिकेत आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझल आणि दीपिकाचा रोमान्सही या सिनेमात पाहायला मिळेल. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड सिनेमा. ट्रेलरमध्ये दीपिका विन डिझलच्या पोटात पिस्तुल रोखताना दिसतेय.शिकारी आणि प्रेयसी अशा दोन्ही व्यक्तिरेखा ती साकारतेय.

'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' सिनेमात नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही भूमिका आहेत.नीना डोबरेवनं कॉमेडी टेक्निकल एक्सपर्ट उभी केलीय तर रुबी एका शूटरच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा हिरो विन डिझल एनएसए एजंटची भूमिका करतोय. सिनेमाचं दिग्दर्शन डीजे करुसोनं केलंय. हा सिनेमा 20 जानेवारी 2017ला सगळीकडे रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 03:34 PM IST

ताज्या बातम्या