आता पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही -करण जोहर

आता पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही -करण जोहर

  • Share this:

karan_johar323218 ऑक्टोबर : 'ए दिल है मुश्किल' वरुन उठलेल्या वादळावर अखेर दिग्दर्शक करण जोहरने मौन सोडलं. भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही असा पवित्रा आता करण जोहरने घेतलाय. तसंच या चित्रपटावर 300 जणांचं भवितव्य अवलंबून आहे त्याला विरोध करू नका अशी विनंतीही केलीये.

उरी हल्ल्यानंतर देशभरा़त पाकविरोधात संतापाची लाट उसळली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला. भरात भर म्हणजे थिएटरचालकांनीही पाक कलाकार असलेले सिनेमे रिलीज करणार नाही असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या 'ए दिल है मुश्किल' चांगलाच 'मुश्किल'मध्ये आला.

पोलिसांसोबत तोडगा न निघू शकल्यामुळे अखेर दिग्दर्शक करण जोहरला बोलावं लागलं. करण जोहरने आता पाकिस्तानी कलाकारांना घेऊन कोणताही चित्रपट बनवणार नाही असं जाहीर केलंय. माझ्यासाठी प्रथम देश असून नंतर चित्रपट आहे. सध्या पाक कलाकारांना घेऊन चित्रपट साकारणे अवघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात असा निर्णय आता घेणार नाही. मला भारतीय सैन्याचा पूर्ण अभिमान असून मी त्यांना सॅल्युट करतो असंही करण जोहर म्हणाला. आता करण जोहरने जाहीर खुलासा केल्यामुळे मनसे आंदोलन मागे घेते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 18, 2016, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading