प्रायश्चित करण्यासाठी ओम पुरी पोहचले शहीद नितीन यादवच्या घरी

प्रायश्चित करण्यासाठी ओम पुरी पोहचले शहीद नितीन यादवच्या घरी

  • Share this:

om_puri18 ऑक्टोबर : सीमेवर जाण्यासाठी कुणी सांगितलं होतं असं बेजाबदार वक्तव्य करणारे ओम पुरी यांना अखेर उपरती झाली. ओम पुरी यांनी आज शहीद नितीन यादव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुबियांची माफी मागितली.

यावेळी ओम पुरी यांनी शहीद नितीन यादव यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी होम हवनही केलं. त्यावेळी त्यांचे डोळे पाणवले देखील होते.  ओम पुरी यांनी कुणालाही दिली नव्हती मात्र तरीही गावकरी तिथे मोठया संक्षेने उपस्थिती होते.

काही दिवसांपूर्वी आयबीएन 7 च्या 'हम तो पुछेंगे' या कार्यक्रमात ओमपुरी यांनी जवानांना सीमेवर जाण्यास कुणी सांगितलं होतं असं असंवेनशील वक्तव्य  केलं  होतं. त्यांच्या या विधानामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. एवढंच नाहीतर पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. ओम पुरी यांनी त्यावेळी झालेल्या प्रकरणावर माफीही मागितली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2016 08:02 PM IST

ताज्या बातम्या