Elec-widget

मुख्यमंत्री खोटारडे, राजीनामा द्या-नारायण राणे

मुख्यमंत्री खोटारडे, राजीनामा द्या-नारायण राणे

  • Share this:

rane on fadanvis18 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 2014 पासून सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर का केले नाही ? असा सवाल उपस्थिती करत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये. तसंच भाजपमध्ये अनेक गुंडांचा समावेश आहे पण मंत्रीही काही बोलत नाही. मुख्यमंत्र्यांनीच गुंडांना क्लीन चिट दिलीये अशी टीकाही राणेंनी केला.

मराठा आरक्षण प्रश्नी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री खोटं बोलत आहे. एकीकडे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाला विरोध नाही असं बोलताय मग नोव्हेंबर 2014 पासून आतापर्यंत कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर का केले नाही ? मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आपली सत्ता राखण्यासाठी ते खोटं बोलतायत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच नारायण राणे यांनी केली. तसंच येत्या हिवाळी अधिवेशनात आम्ही अविश्वास ठराव आणणार अशी माहितीही राणे यांनी दिली.

जे जातीवरून घडतयं ते त्वरीत बंद झाले पाहिजे. नाशिकमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याला गिरीष महाजन जबाबदार आहे. त्यांच्या विधानामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला असा आरोपही राणेंनी केला.

भाजपमध्ये अनेक गुंडांचा समावेश आहे. हे आम्ही याआधी सांगितलं होतं. आता बाबा बोडके यांच्यासोबत फोटो काढून मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केलंय. भाजपमधले मंत्रीही काही बोलत नाही आणि मुख्यमंत्रीही त्यांना क्लीन चिट देता अशी टीकाही राणेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2016 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com