'ए दिल है मुश्किल'च्या टीमची पोलिसांकडे धाव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2016 06:17 PM IST

'ए दिल है मुश्किल'च्या टीमची पोलिसांकडे धाव

karan_johar_fawad18 ऑक्टोबर : पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) 'ए दिल है मुश्किल'च्या निर्मात्यांना पोलिसांत धाव घ्यावी लागली. पोलिसांनी सिनेमागृहांना संरक्षण देऊ असं आश्वासन दिलंय.

'ए दिल है मुश्किल' चित्रपटावर तोडगा निघू शकला नाही, मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाला मनसेने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रोड्युसर्स गिल्डच्या सदस्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हा सिनेमा सुरळीतपणे रिलीज होऊ देण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. त्यासोबत मनसेलाही विरोध सोडून प्रेमाने तोडगा काढावा अशी विनंती केली. पण मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर प्रत्येक सिनेमागृहात आम्ही संरक्षण देऊ असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2016 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...