S M L

साक्षी मलिकची 'सुलतान' लव्ह स्टोरी

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2016 06:20 PM IST

साक्षी मलिकची 'सुलतान' लव्ह स्टोरी

 17 ऑक्टोबर : रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी कुस्तीपटू साक्षी मलिक नवी इनिंग सुरू करतेय. साक्षीचा तिचा प्रियकर सत्यव्रत कादियानसोबत साखरपुडा झालाय. सत्यव्रत कादियान हाही कुस्तीपटू आहे. हरियाणामधल्या रोहतकमध्ये रविवारी साक्षी आणि सत्यव्रतचा साखरपुडा झाला. सत्यव्रत कादियानच्या घरी कुस्तीची परंपरा आहे. सत्यव्रतचे वडील अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आहेत. सत्यव्रतनेही 2010 च्या यूथ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवलंय. साक्षी आणि सत्यव्रतचं कुस्तीच्या स्पर्धांमध्येच प्रेम जमलं. सत्यव्रत 22 वर्षांचा आहे तर साक्षी 24 वर्षांची आहे.

रोहतकमध्ये छोटेखानी साखरपुडा झाल्यानंतर आता डिसेंबरमध्ये या दोघांचं लग्न होईल, असं बोललं जातंय. सत्यव्रतची माझ्या करिअरमध्ये बरीच मदत होते आणि माझी स्वप्नं ही त्याचीही स्वप्नं आहेत, असं साक्षी म्हणते. सत्यव्रत आणि साक्षी हे दोघंही रेल्वेमध्ये नोकरी करतात. 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्सनंतर या दोघांचं लग्न ठरलं. सत्यव्रतला 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल मिळालं होतं.

साक्षी आणि सत्यव्रतची प्रेमकहाणी ऐकून सगळ्यांनाच सुलतान सिनेमाची आठवण झाली. 'सुलतान'मध्ये सलमान खान आणि अनुष्का हे दोघेही कुस्तीपटूच्या भूमिकेत आहेत. सलमानने रंगवलेला सुलतान अनुष्काने रंगवलेल्या 'आरफा'च्या प्रेमात पडतो. गावखेड्यांतला हा कुस्तीपटू सुलतान स्वत:ला आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सिद्ध करतो, अशी या सिनेमाची कहाणी.साक्षी आणि सत्यव्रत या दोघांचंही कुस्तीमधलं करिअर आणखी बहरावं, अशा शुभेच्छा सगळेजण देतायत. पुढच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि टोकिओ ऑलिम्पिकमध्येही हे दोघंही जण मेडल्स मिळवतील, अशीही अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 06:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close