S M L

दीपिका पदुकोणला हवेत आमिर, भंसाळी आणि रणवीर बिग बॉसच्या घरात

Samruddha Bhambure | Updated On: Oct 17, 2016 12:05 PM IST

दीपिका पदुकोणला हवेत आमिर, भंसाळी आणि रणवीर बिग बॉसच्या घरात

17 ऑक्टोबर: बिग बॉसच्या दहाव्या सिझनची सुरुवात एकदम दिमाखात झाली. सलमान खानचा नेहमीप्रमाणे जलवा पाहायला मिळालाच. पण खास आकर्षण होतं ते दीपिका पदुकोणचं. दीपिका बिग बॉसच्या प्रीमियरला खास पाहुणी होती. पहिल्यांदाच बिग बॉसच्या प्रीमियरला सलमान खानसोबत बॉलिवूड कलाकार होती. आतापर्यंत सलमान खाननं बिग बॉसची सुरुवात एकट्यानंच केली होती. याच वर्षी हा बदल झाला.

दीपिका आपला पहिला हॉलिवूड सिनेमा 'एक्स एक्स एक्स-रिटर्न ऑफ जेंडर केज'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर आली होती. दीपिकाला बिग बॉसच्या घरात महत्त्वाच्या सेलिब्रिटींना बघायचंय. तिची इच्छा आहे, आमिर खानला बिग बॉसच्या घरात बंद करून ठेवलं पाहिजे. याशिवाय तिला संजय लीला भंसाळीलाही बिग बॉसच्या घरात ठेवायचंय. रणवीर सिंग बिग बॉसच्याघरात गेला तर चांगली करमणूक करेल, असं दीपिकाला वाटतंय. दीपिकानं थोड्या वेळ बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांशी संवाद साधला. तिच्या हॉलिवूड सिनेमाचं ट्रेलर लाँचही झालं. दीपिकामुळे बिग बॉसच्या प्रीमियरमध्ये चांगलाच रंग भरला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 10:53 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close