मी गोपीनाथ मुंडेंचा वारस हक्कदार नाही-धनंजय मुंडे

मी गोपीनाथ मुंडेंचा वारस हक्कदार नाही-धनंजय मुंडे

  • Share this:

dhanjay_munde_Sot12 ऑक्टोबर : मला कुणाचाही वारसा नाही. मी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन पुढं आलो नाही. स्वकर्तृत्वानं पुढं आलो आहे आणि मला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आशीर्वाद आहे अशी रोखठोक भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी आयबीएन लोकमतवर मांडली. तसंच पंकजांनी आणि जानकरांनी मुख्यमंत्री आणि सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्याविरोधात बडतर्फाची मागणी करणार अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिलीये.

मंगळवारी भगवानगडाच्या पायथ्याशी पार पडलेल्या दसरा मेळाव्यात राज्यमंत्री महादेव जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर परळीचा चमचा आहे अशी टीका केली होती. तसंच अजित पवारांवरही शिवराळ भाषेत टीका केली होती. या वादावर आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी घेतलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडेंनी सडेतोड भूमिका मांडली.

भगवान गडाखाली भाषण करणा•या सर्व नेत्यांची हतबलता आणि अस्वस्थता दिसून आली. त्यामुळे जानकरांनी अशी भाषा वापरली. आता आम्हालाही त्यापेक्षा वाईट भाषा बोलता येते. पण आम्हाला आमच्या नेतृत्वाकडून योग्य संस्कार दिले आहे. जानकरांना याची किंमत चुकवावी लागेल. बारामतीची वाट लावणा•यांना अनेक जन्म घ्यावे लागतील असा पलटवार धनंजय मुंडेंनी केला.

'जानकरांना बडतर्फ करा'

मंत्रिपद असताना अशा शिवराळ भाषेत टीका करणा•या महादेव जानकारांच्या विरोधात सभागृहात हक्कभंग आणणार आहे. जानकरांनी मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख करून त्यांचाही अवमान केलाय. अशा मंत्र्यांना ही भाषा शोभणारी नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. यासाठी राज्यपालांना भेटून बडतर्फीची मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. तसंच जानकरांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी कुणाचे पाय धरले हे सर्वांना माहित आहे. आता तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालाय. त्यामुळे धनगरांना आरक्षण देण्याच्या आश्वासनाचं दिलं होतं त्याचं काय झालं ? असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थिती केला.

'मी कुणाचाही वारसा घेऊन आलो नाही'

मी कधी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन पुढे आलो नाही. माझे वडील पंडित अण्णा मुंडे यांचा वारसा माझ्याकडे आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला तो 2 वर्षांमध्ये साध्य करून दाखवला आहे. मी कधीच कुणाचा वारस हक्कदार आहे असं मी कधीच बोललो नाही आणि बोलणार नाही असं गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं. तसंच भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांचं पहिलं भाषण झालं होतं. त्या भाषणाचा मी एकमेव साक्षीदार होतो. त्यावेळी प्रत्येक भाषणात भगवानगडाचा शब्द माझ्यासाठी अखेरचा असेल असं गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे. आता त्यांचा हा शब्द सर्वांसाठी लागू असतो. पण हे मान्य करणे न मान्य करणे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आज जे भगवानगडाच्या पायथ्याशी आले त्यांनी यांचं चिंतन करावं असा टोलाही धनंजय मुंडेंनी पंकजांना लगावला.

'कायदा हातात घेऊ नका'

राज्यभरात महादेव जानकरांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रान उठवले आहे. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, कायद्याच्या चौकटीत राहुनच आंदोलन करावं असं आवाहनही धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 12, 2016, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading