S M L

किवींना व्हॉईटव्हाश, भारताने लुटलं विजयाचं सोनं !

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2016 06:26 PM IST

किवींना व्हॉईटव्हाश, भारताने लुटलं विजयाचं सोनं !

11 ऑक्टोबर : सलग दोन कसोटी सामन्यात न्युझीलंडला पराभूत करुन आज अखेरच्या सामन्यातही न्यूझीलंडला धुळ चारत भारताने विजयाचं सोनं लुटलंय. इंदूर कसोटीत भारताने न्यूझीलंडचा तब्बल 321 धावांनी पराभव करत कसोटी मालिका 3-0 ने जिंकलीये.

इंदूर कसोटीत भारताने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला व्हाईटव्हॉश दिला. आरअश्विननं न्यूझीलंडचा डाव पार धुळीस मिळवला. अश्विननं या सीरिजमध्ये एकूण 27 विकेट्स घेतल्या. वॉटलिंग आणि बोल्ट यांनी भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यावर चांगली फटकेबाजी केली. पण अश्विननं सातवी विकेट घेतली आणि टीम इंडियासाठी ही 'विराट'दशमी ठरली. अश्विनला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला.

याआधी चौथ्या दिवशी भारतानं 3 विकेट्सवर 216 रन्स करून इनिंग घोषित केली. पहिल्या डावात भारताने 258 रन्सची आघाडी घेतली होती त्यामुळे भारताने न्यूझीलंडच्या समोर 475 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडची टीम भारतीय बॉलरच्या माऱ्यापुढे ढेर झाली. आजच्या सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली ती चेतेश्वर पुजारानं. त्यानं नाबाद 101 रन्सचा डोंगर उभा केला. पुजारानं आपल्या नवव्या चौकारासोबत आपलं आठवं शतक पूर्ण केलं. याशिवाय गौतम गंभीरनंही अर्धशतक केलं. या मालिकेसह भारताने कसोटी मालिकेतील क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2016 06:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close