नागपुरात नव्या गणवेशात संघ स्वयंसेवकांचं पथसंचलन

नागपुरात नव्या गणवेशात संघ स्वयंसेवकांचं पथसंचलन

  • Share this:

Mohan Bhagwat Banner213

11 ऑक्टोबर :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्याच्या पथसंचलनाला नागपुरात सुरुवात झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच नव्या गणवेशात स्वयंसेवकांच पथसंचलन होत आहे.

सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरील संभाव्य भाष्य हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. तसंच भारतीय आर्थिक सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

 संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वयंसेवकांनी सलामी दिली आहे. रेशीमबागेत होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी संघाच्या पथसंचलनात दुप्पट स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 11, 2016, 8:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading