भगवानगडावर भाषण करणारच,पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

भगवानगडावर भाषण करणारच,पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

  • Share this:

pankaja_munde_sot

10 ऑक्टोबर : 'मी कुणालाही धमकी दिली नाही आणि माझे कुणाशीही वाद नाही' असं सांगत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी वादग्रस्त ऑडिओ क्लीपवर अखेर मौन सोडलंं. उद्या भगवानगडावर जमावबंदी जरी लागू केली असली तरी आपण भाषण करणारच असा निर्धारही पंकजांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.

'नामदेवशास्त्रींना दसरा मेळाव्यानंतर पाहुन घेते' अशी धमकी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पंकजांच्या या धमकी क्लीपमुळे विरोधकांनी पंकजा मुंडेंच्या राजीनाम्यांची मागणी केली होती. अखेर या वादावर पंकजा मुंडेंनी आज मौन सोडलं. आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीशी बातचीत करताना पंकजांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मुंडे साहेबांनी माझ्या मागे मोठी शिदोरी ठेवलीय. ज्या धमकी क्लीपवरुन गोंधळ उडालाय. त्यात छेडखानी करण्यात आलीये. त्यामुळे त्या धमकी क्लिपची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अशी माहिती पंकजांनी दिली.

'पंकजांकडून वादावर पडदा'

तसंच मी नामदेवशास्त्रींबद्दल काहीही बोलले नाही. त्यांच्या बद्दल मनात आदरच आहे. आजपर्यंत त्यांनी जे सांगितले ते ऐकत आलीये. मीही भगवानगडाची कन्या आहे. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही वाद नाही. त्यांनी जो मार्ग दाखवला तो आम्ही स्विकारलाय. उगाच कुणी तरी भगवानगडाला वादाचं रुप दिलंय असं सांगत पंकजा मुंडेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

'भाषण करणारच'

मी कुणालाही धमकी दिली नाही आणि देणार नाही. आता विरोधकांचं राजीनामा मागण्याचं कामच आहे. पण, मी राजीनामा देणार नाही. राहिला प्रश्न भगवानगडावर भाषण करण्याचा. तर लोकांनीच मला भगवानगडावर बोलावलं आहे त्यामुळे भगवानगडावर मी भाषण करणारच आणि नियमांचं पालन करून बोलणार असंही पंकजा मुंडे स्पष्ट केलं. तसंच भगवानगडावरुन वाद होत असल्यामुळे वेदना होतात आता कोणताही वाद नको, गडावर येणा•या सर्वांनी शांतता पाळावी आणि भगवान बाबांच्या विचारांचं पालन करा असं आवाहनही पंकजांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 10, 2016, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading