S M L

फवाद खाननंतर उरी हल्ल्यासंदर्भात माहीरानेही सोडले मौन

Samruddha Bhambure | Updated On: Oct 10, 2016 01:20 PM IST

फवाद खाननंतर उरी हल्ल्यासंदर्भात माहीरानेही सोडले मौन

10 ऑक्टोबर : पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खाननं उरी हल्ल्यासंदर्भात मौन सोडलं .ती म्हणाली,' देश कुठलाही असो दहशतवादी घटनांचा मी निषेध करते. दहशतवादी घटना कुठल्याही देशात घडली तरी मी निषेध करते.

'महिरा खाननं शनिवारी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं की ती गेली पाच वर्ष कलाकार म्हणून काम करतेय. आपण व्यावसायिक आहोत आणि पाकिस्तानाचं प्रतिनिधित्व करतो, हेही तिनं लिहिलंय. पुढे ती म्हणते, ' मी नेहमीच माझ्या परीने देशाचं नाव उंच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ती पुढे म्हणाली की, ' जिथे माझी मुलं दहशतवादाशिवाय राहू शकतील, अशा विश्वाचं मी स्वप्न पाहतेय. आणि सगळ्यांनीच हे स्वप्न पाहावं.'माहिराला भारतात प्रसारित होणार्‍या 'जिंदगी' या चॅनलवरच्या 'हमसफर' मालिकेमुळे प्रसिध्दी मिळाली.याशिवाय शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटातसुध्दा ती आहे,जो पुढच्या वर्षी रिलीज होतोय.सध्याची स्थिती पाहता त्या चित्रपटावरसुध्दा बंदीची टांगती तलवार येऊ शकते.

गेले काही दिवस पाकिस्तान कलाकारांना भारतात कामाची परवानगी देण्याविषयी अनेक चर्चा सुरू आहेत.. पण पाकिस्तानी कलाकार मात्र मूग गिळून गप्प बसले होते.हल्लीच शफकत अमानत अली आणि सलमान अहमद या लोकप्रिय संगीतकारांनी उरीच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला...दोन्ही देशांमधली परिस्थिती नियंत्रणात यावी ,अशी अपेक्षाही व्यक्त केली. दोनेक दिवसांपूर्वी फवाद खानने यावर फेसबुकवरुन आपलं मत मांडलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2016 12:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close