'बिग बॉस 10'ची पाहुणी दीपिका पदुकोण?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2016 10:22 AM IST

'बिग बॉस 10'ची पाहुणी दीपिका पदुकोण?

Big Boss_ Deepika

10 ऑक्टोबर: सलमान खानचा प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉस येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरु होतोय. या शोचा हा दहावा सीझन आहे.आणि या वेळी शोमध्ये त्याची पहिली पाहुणी दीपिका पदुकोण असेल अशी सध्या चर्चा आहे...दीपिकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा- 'ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ द झॅण्डर केज' लवकरच रिलीज होतोय.त्याच्याच प्रमोशनसाठी दीपिका शोमध्ये येईल असा अंदाज आहे.

याआधी तिच्या 'तमाशा' सिनेमाच्या रिलीजच्या वेळी सुद्धा तिने या शोच्या सेटवर येऊन धमाल केली होती.

बिग बॉसमध्ये सलमान खान हा मुख्य युएसपी आहे. विशेषत: दर वीकेण्डला येऊन तो बिग बॉसमधल्या सदस्यांची झाडाझडती घेतो. अनेकदा त्याच्यासोबत बॉलिवूड सेलिब्रिटीज असतात. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज आतापर्यंत येऊन गेल्यात. 16 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या बिग बॉसच्या जलव्यात दीपिकाला पाहायची सगळ्यांना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2016 08:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...