S M L

दादर :ज्ञानरुप इमारतीची आग आटोक्यात, 6 जणांची सुखरुप सुटका

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2016 10:24 PM IST

दादर :ज्ञानरुप इमारतीची आग आटोक्यात, 6 जणांची सुखरुप सुटका

मुंबई 09 ऑक्टोबर : प्रभादेवी परिसरातील ज्ञानरुप इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून 6 जणांची सुखरुप सुटका केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सिद्धिविनायक मंदिराच्या मागे असलेल्या ज्ञानरुप इमारतीत सिलेंडर स्फोटामुळे आग लागली होती. या दुर्घटनेमुळे इमारतीत सहा जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन वेळीत आग आटोक्यात आणली आणि सहाही जणांची सुखरुप सुटका केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मालमत्तेचं नुकसान झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2016 09:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close