पाक कलाकारांबद्दलच्या वादानंतर अखेर फवाद खान बोलला

पाक कलाकारांबद्दलच्या वादानंतर अखेर फवाद खान बोलला

  • Share this:

Fawad-family

08 ऑक्टोबर : उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यासाठी आंदोलनं झाली. फवाद खानच्या 'ए दिल है मुश्कील' या सिनेमावरूनही बराच वादंग निर्माण झाला. आता या वादाबद्दल फवाद खानने मौन सोडलंय. फवाद खान सध्या पाकिस्तानात आहे. त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

'मी जुलैपासून लाहोरमध्येच आहे. मी आणि माझी पत्नी आमच्या दुसर्‍या मुलाच्या येण्याची वाट बघत होतो.गेल्या काही दिवसांत मला मीडियाकडून अनेक बर्‍याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यापैकी अनेकांना माझी या हल्ल्याबद्दलची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती.'

'दोन मुलांचा वडील या नात्याने मलाही सामान्य लोकांप्रमाणे हेच वाटतं की आपण शांतता प्रस्थापित करायला हवी. मी या विषयावर पहिल्यांदाच बोलत आहे. जर यापूर्वी माझ्या नावाने काही म्हटले गेले असेल तर ते खोटं समजावं. कारण याबद्दल मी आधी काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये.'

'ज्यांनी प्रेम आणि जागतिक ऐक्याला आपला पाठिंबा दाखवला त्या माझ्या सर्व चाहत्यांचे, पाकिस्तान आणि भारतातल्या सर्व कलाकारांचे आणि जगभरातल्या सगळ्यांचेच मी आभार मानतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 8, 2016, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading