कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचं नोबेल

कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचं नोबेल

  • Share this:

Juan Manual pic207 ऑक्टोबर : कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष ज्युआन मॅन्युअल सान्तोस यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. कोलंबियामध्ये सुमारे 50 वर्ष बंडखोरांशी सुरू असलेला संघर्ष शमवल्याबद्दल या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

कोलंबियामध्ये डाव्या बंडखोरांनी चालवलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 2 लाख 60 हजार लोकांचा बळी गेलाय. तर 60 लाखांहून जास्त जणांना स्थलांतर करावं लागलंय. कोलंबियाचे संरक्षण मंत्री असतानाच ज्युआन मॅन्युअल यांनी हा संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. 2010 मध्ये ते कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2014 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले.

कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेमधला छोटासा देश. या देशात रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया बंडखोर संघटनेच्या हिंसाचारामुळे अनेक वर्षं अशांतता होती. पण या बंडखोरांशी वाटाघाटी करून ज्युआन सान्तोस यांनी कोलंबियामध्ये शांतता प्रस्थापित केली. रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया या संघटनेची स्थापना 1964 मध्ये झाली. या संघटनेचे बंडखोर मार्क्स आणि लेनिनचा आदर्शवाद बाळगल्याचा दावा करतात. आधी या संघटनेत छोटे शेतकरी आणि शेतमजूरांचा समावेश होता. कोलंबियामधल्या असमानतेविरुद्ध त्यांचा लढा सुरू झाला पण नंतर त्याची जागा हिंसाचाराने घेतली. आता मात्र या बंडखोरांशी वाटाघाटी करून तोडगा निघालाय आणि त्यामुळे कोलंबियात शांतता प्रस्थापित झालीय. याचं श्रेय ज्युऑन मॅन्युअल सान्तोस यांना जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 7, 2016, 4:30 PM IST

ताज्या बातम्या